लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार; जाणून घ्या कारण काय?  Ladki Bahin Yojana May Installment list

Ladki Bahin Yojana May Installment List: नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच मे महिन्यामध्ये जमा केलेला आहे. तरी देखील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशा प्रकारचा प्रश्न राज्यभरातील महिलांकडून विचारण्यात येत आहे. तसेच राज्यातल्या अनेक महिलांना मे महिन्याचा हप्ता केवळ 500 रुपये जमा होणार आहे. कोणत्या महिलांना केवळ 500 रुपये जमा होणार आहेत? आणि त्याचे काय कारण आहे. आणि मे महिन्याचा हप्ता महिलांना कधी मिळणार आहे? अशा प्रकारची सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

लाडक्या बहिणींना मे महिन्यात केवळ 500 रुपये मिळणार

राज्यभरातील लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावर आतापर्यंत एकूण 12 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. परंतु मे महिन्यामध्ये अकरावा हप्ता हा काही महिलांचे बँक खात्यामध्ये केवळ 500 रुपये जमा करण्यात येणार आहे. लाडके बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 1500 रुपये जमा करण्यात येतात परंतु राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना आता केवळ 500 रुपये मिळणार आहेत.

जवानाच्या तत्परतेने चिमुकलीचा जीव वाचला; व्हिडीओ आला समोर

नमो शेतकरी आणि लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपयेच मिळणार

राज्यामधील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना राज्य सरकारकडून 1,000 रुपये देण्यात येतात. परंतु नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून ज्या महिला 1,000 रुपये लाभ घेत आहेत अशा महिलांना केवळ आता 500 रुपये जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे.

Ladki Bahin Yojana May Installment list

आधार कार्डच्या माध्यामातून 50 हजार रुपये मिळणार; Aadhar Card Loan

राज्यभरातील अनेक महिला ह्या नमो शेतकरी योजना तसेच लाडकी बहिणी योजनेचा दुहेरी लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आलेले होते. त्यानंतर सरकारने या नियमात बदल केलेला असून महिलांच्या अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यप्रातील नमो शेतकरी योजना ( Namo Shetkari Yojana)  चा पात्र असणाऱ्या महिलांना आता केवळ 500 रुपये हप्त जमा करण्यात येणार आहे.

तसेच लाडकी बहीण योजनेचा मे 2025 चा हप्ता ( Ladki Bahin Yojana May Installment )  कधी जमा करण्यात येणार अशा प्रकारचा प्रश्न महिला व बालविकास मध्ये आदिती तटकरे यांना विचारला असतात त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना आधीची तटकरे यांनी सांगितले आहे की, मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता जमा करण्यात येणार आहे. कसे पाहता लाडकी योजनेच्या निधीमुळे सरकारचे तिजोरीवर खूप मोठा ताण पडत आहे. आणि यामुळे सरकारला देखील खूप मोठ्या प्रमाणावर तडजोड करावी लागत आहे.

आधार कार्डच्या माध्यामातून 50 हजार रुपये मिळणार; Aadhar Card 50 Thousand

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार

2100 रुपये कधी मिळणार याबाबत अजून पर्यंत देखील सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारने या चालू 2025-26 या अर्थसंकल्पामध्ये देखील लाडकी बहिणी योजनेसाठी तरतूद केलेली नसल्यामुळे या वर्षांमध्ये देखील लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाही. हे माहीत असणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे सरकार पुढच्या वर्षी देखील लाडक्या बहिणींना निर्णय घेणार का? याकडे महिलांचे लक्ष लागून राहील.( Ladki Bahin Yojana May Installment list )

Leave a Comment